Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवावे : पीएसआय भरत दाते
    जामनेर

    विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवावे : पीएसआय भरत दाते

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क । पहुर, ता . जामनेर ।

    विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवावे, आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी सातवीच्या विद्यार्थिनींनी समूह नृत्याने उपस्थितांचे स्वागत केले. नववीच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव घोंगडे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पहुर कसबेच्या सरपंच आशा जाधव होत्या.

    सुरुवातीला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी अहवाल सादर केला. यावेळी ॲड. एस.आर.पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव भगवान घोंगडे, कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, संचालक लक्ष्मण गोरे, अशोक बनकर, ज्ञानेश्‍वर लहासे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी सरपंच देवका बनकर, शंकर जाधव, उपसरपंच शरद पांढरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, योगेश भडांगे, विक्रम घोंगडे, अर्जुन लहासे, श्रावण घोंगडे, ज्ञानेश्‍वर रोकडे, प्रभाकर गीते, दीपक जाधव, संतोष चौधरी, योगेश बनकर, तुकाराम जाधव, सचिन कुमावत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    गुणवंतांचा गौरव

    क्रीडा क्षेत्रात तायक्वांदो, ॲथलेटिक्स, खो -खो आधी स्पर्धांमधील विजेत्यांसह शासकीय चित्रकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व विज्ञान प्रदर्शनातील बाल संशोधकांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले .

    ४२ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह

    जामनेर येथील आनंदयात्री परिवाराचे सदस्य गणेश राऊत आणि ज्ञानवेद प्रबोधिनीचे अध्यक्ष शंकर भामेरे यांच्यातर्फे मोनाली बनकर, जागृती चौधरी, गायत्री मोहणे यांच्यासह पहिली ते दहावीपर्यंतच्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या ४२ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

    गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप

    डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाची दिवंगत विद्यार्थिनी बालकवयित्री ज्ञानेश्‍वरी भामेरे हिच्या स्मृती प्रित्यर्थ पाच गरीब मुलींना शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्यातर्फे शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले.

    यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका कल्पना बनकर, ज्येष्ठ शिक्षक अमोल क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे तर क्रीडा विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.