गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी नरेंद्र नारखेडे यांचे आवाहन
साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन आपला विकास करून आपले ध्येय साध्य करावे, असे सातपुडा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. फैजपूर येथील सातपुडा अर्बन सहकारी पतसंस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपासह गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म.स.सा.कारखानाचे माजी चेअरमन शरद महाजन यांनीही मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संस्था करीत असलेल्या सामाजिक आर्थिक विकासाचे कार्याचा गौरव केला. संस्थापक-चेअरमन प्रा.एस.जे.पाटील, दूध संघाचे जिल्हा संचालक नितीन चौधरी, सिनेट सदस्य प्रा.पद्माकर पाटील, चंद्रशेखर चौधरी, माजी चेअरमन के.डी.भंगाळे, माजी नगराध्यक्ष चोलदास पाटील, पी.के.चौधरी, विजय परदेशी, धनराज फिरके, हर्षद महाजन, प्रा.एस.एस.पाटील, केतन किरंगे, आप्पा चौधरी, दूध संघाचे माजी संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संस्थेला ४२ लाख नफा झाला आहे. वाटणीसाठी २४ लाख नफा मधून दहा टक्के डिव्हिडंड चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी जाहीर केला. तसेच नेपाळ बस अपघातात दिवंगत झालेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाला संचालक सुनील वाढे, गिरीश चौधरी, नयना चौधरी, सुनीता चौधरी, डॉ.उमेश चौधरी, किरण चौधरी, राजेश महाजन, हाजी शब्बीर जनाब, किशोर वाघुळदे, वामन नेहते, जयप्रकाश चौधरी, व्यवस्थापक काशीनाथ वारके उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किशोर नेहते, विजयकुमार सावकारे, तुषार महाजन, विलास तायडे, विजय चौधरी, किशोर चौधरी, गौरव नारखेडे, डिगंबर कोल्हे, प्रतिभा भंगाळे यांनी परिश्रम घेतले.