य.ना.चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वर नेरकर यांचे प्रतिपादन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
वय वर्ष ५ ते २५ दरम्यान मेंदूची स्वीकारण्याची क्षमता योग्य असते. मेंदू परिपक्व होतो. लहानपणी ज्या सवयी लागतात. त्या मेंदूचा एक भाग बनतात. त्या मोठेपणी सुद्धा कायम सोबत राहतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वय वर्ष २५ पर्यंत स्वतःला काळजीपूर्वक जपले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी झोपण्यापूर्वी एक तास आणि उठल्यानंतर एक तास आपला मोबाईल उघडून पाहू नये असा महत्त्वपूर्ण संदेश ज्ञानेश्वर नेरकर (डिजिटल वेलनेस, फोकस मास्टरी कोच, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव, नॅक क्रायटेरिया क्रमांक सात आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लक्ष्मी नगर सेंटर व दत्तवाडी सेंटर चाळीसगाव तसेच रोटरी परिवार चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मोबाईल व्यसनमुक्ती अभियान’ विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्माकुमारी वंदना दीदीजी संचालिका, लक्ष्मीनगर, ब्रह्माकुमारी ॲड. सुनिता दीदीजी संचालिका, चाळीसगाव, डॉ. उल्हासभाई अमरावती, डॉ. हेमंतभाई धुळे, प्रमोदभाई धुळे, अनिल मालपुरे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव, आधार महाले अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम, डॉ.अनिल साळुंखे, श्रीकृष्ण अहिरे सचिव, रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम, बलदेवभाई पुंशी, लालचंद बजाज, उपप्राचार्य डॉ. उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ. जी.डी. देशमुख, क्रायटेरिया क्रमांक सातचे समन्वयक डॉ.सौ.एन.पी.गोल्हार उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, क्रायटेरिया क्रमांक सातच्या समन्वयक डॉ.सौ.एन.पी. गोल्हार, डॉ. स्वप्निल वाघ, प्रा.आदर्श मिसाळ, श्री.सैंदाणे, श्री.देवकर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन डॉ.सौ. एन. पी.गोल्हार तर आभार डॉ.जी.डी.देशमुख यांनी मानले.