Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»H.E. Shyam Chaitanya Maharaj : विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्तेसह स्वसंरक्षणासाठी आवश्यक गोष्टीही आत्मसात करा : प.पू. श्याम चैतन्य महाराज
    जामनेर

    H.E. Shyam Chaitanya Maharaj : विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्तेसह स्वसंरक्षणासाठी आवश्यक गोष्टीही आत्मसात करा : प.पू. श्याम चैतन्य महाराज

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेरातील आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाप्रसंगी प्रतिपादन

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    विद्यार्थिनींनी उज्ज्वल भविष्यासाठी अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवावा. शिक्षण घेतांना शैक्षणिक गुणवत्तेसह स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक गोष्टीही आत्मसात कराव्यात, असे प्रतिपादन गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट चैतन्य धामचे संस्थापक-अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केले. येथील पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात वसंतराव नाईक अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात महिला सदस्य म्हणून अंजू पवार, सविता राठोड, माधुरी नाईक, पितांबर राठोड, पुखराज पवार यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ५० विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

    सत्कार सोहळ्यात प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी भाषणाची सुरुवात काव्यपंक्तीने केली ती अशी…

    तुम चलो, हम साथ हैं तुम्हारे,
    हर मोड पर सत्कार मिलेगा ।
    बस लक्ष्य न भूलो जीवन का,
    एक दिन यश अपार मिलेगा ।।

    शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,

    “ सपनों को सच कर दिखाना है,
    खुद को दुनिया में चमकाना है ।
    सत्कार नहीं बस शुरुआत है,
    अब तुम्हें सितारा बन जाना है ।। ”

    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, विठ्ठल जाधव, बी.बी. धाडी, रोहिदास पवार, सुरेश जाधव, भारमल नाईक, जामनेरचे विस्ताराधिकारी पितांबर राठोड, गारखेडाचे केंद्रप्रमुख पुखराज पवार, पाचोराचे मुख्याध्यापक सिताराम पवार, पाचोराचे विस्तार अधिकारी अनारसिंग राठोड, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, रमेश नाईक, तूकडू नाईक, प्रा.इंदल जाधव, रामकिसन नाईक, भाईदास चव्हाण, उदल नाईक, नटवर चव्हाण, लालचंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी विठ्ठल जाधव, बन्सीलाल चव्हाण, खेमराज नाईक, रमेश चव्हाण, चिंतामण राठोड, प्रकाश चव्हाण, तुकाराम राठोड, अशोक पवार, महेंद्र नाईक, प्रदीप जाधव, उदयसिंग पवार, सुनील राठोड, अर्जुन चव्हाण, जवलसिंग राठोड, विनोद राठोड, कनकसिंग पवार आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बन्सीलाल चव्हाण तर सूत्रसंचलन खेमराज नाईक यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.