विद्यार्थ्यांनी निभावली शिक्षकांची भूमिका

0
33

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे शिक्षक दिन तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतिष पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक विनोद देसले यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रतिमा पूजन केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत शाळेचा संपूर्ण कार्यभार सांभाळला. यासाठी त्यांना सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कैलासबापू सूर्यवंशी यांनी तसेच संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार भूषण बहिरम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here