साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मोबाईल सायन्स व्हॅनमधील प्रयोगांचा जळगाव येथील बालविश्व इंग्लिश मीडियम व बालविश्व प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांनी ही व्हॅन बालविश्व शाळेला उपलब्ध करून दिली. ७० विद्यार्थ्यांनी व्हॅनमधील प्रयोग पाहिले. डॉ. घोष यांच्या समवेत अनिरूध्द मांगदीकर, लेखमाला इंगळे, लौकिक पाटील, गौरव पाटील या विद्यार्थ्यांनी प्रयोगांची माहिती दिली. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शाळांना विद्यार्थ्यांना फिरती विज्ञान प्रयोगशाळा दाखवायची असेल त्यांनी विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे समन्वयक डॉ. घोष (८९९९५४५२९२) अथवा मोहिनीराज नेतकर (९४२२३३८१३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.