साईमत मलकापूर प्रतिनिधी
येथील मौजे वाकोडी ता. मलकापुर जि. बुलडाणा येथील विद्या विकास महाविद्यालय असुन सदर संस्थेचे संचालक प्रा. हितेश पाटील व मुख्याध्यापक दिलीप अढाव यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांची पास होण्यासाठी 10 ते12 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात फसवणूक करीत आहे अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे संदीप भगत यांनी केली आहे .
सदर तक्रारी मध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये १२ वी कला व विज्ञान शाखेची परिक्षा होत असते या मध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी त्यांचेच महाविद्यालय सेंटर मिळते. याचा फायदा घेत प्राध्यापक हितेश पाटील व अढाव सर हे संगनमताने विज्ञान शाखेच्या बिद्यार्थ्यांकडुन जास्त टक्केवारीचे आमिष देवुन प्रत्येक विद्यार्थ्यांकडुन १० ते १२ हजार रुपये गोळा करतात व त्याचे नियोजन प्राध्यापक व अढावसर करतात.
या मध्ये शाळेचे संचालक प्रा. हितेश पाटील हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम करतो, दुसरे महत्वाचे असे की, याची सखळी पुढील प्रमाणे आहे. विद्या विकास प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक राहुल गायकवाड हे आहेत, यांचा भाऊ विक्की गायकवाड याच्या नावाने बुलडाणा अर्बन शाखा मलकापुर येथे खाते उघडवून या मध्ये प्रत्येकी मुलांना १० ते १२ हजार रुपये जमा करण्याचे प्राध्यापक हितेश पाटील व मुख्याध्यापक अढाव हे सांगत असतात, पैसे नाही भरले तर टक्केवारी कमी मिळेल व पुढे तुम्हाला चांगल्या कॉलेज मध्ये नंबर लागणार नाही असे सांगतात,त्यामुळे विद्यार्थी घाबरुन जावून विक्की गायकवाड याच्या खात्यामध्ये पैसे भरतात, असा यांचा शिक्षणाच्या नावाखाली फसवणूकीचा गोरख धंदा सुरु आहे. प्रतिबंधक विभाग विज्ञान या शाखेमध्ये प्रत्येक वर्षी ३०० ते ४०० विद्यार्थी परिक्षा देतात, व या विद्यार्थ्याकडून प्रत्येक वर्षी हे अंदाजे ४ ते ५ कोटी रुपये विक्की गायकवाड याच्या खात्यात जमा करतात, विक्की गायकवाड व विद्यार्थी यांचा कसल्याच प्रकारचा संबंध येत नसून सदर विक्की गायकवाड याच्या खात्यात प्रत्येक वर्षी जमा होत असलेली रक्कमेची चौकशी करावी कारण विक्की गायकवाड हा बेरोजगार असून यांच्या खात्यात एवढी रक्कम कसी व कोठून . आली याची सुध्दा चौकशी करुन कार्यवाही करावी. तसेच प्रा. हितेश पाटील, विक्की गायकवाड यांचा मागील चार महिन्याचा मोबाईल फोनचा सि.डी.आर. तपासला तर सर्व बाबी उघड होतील.
तरी विद्या विकास महाविद्यालयाचे संचालक हितेश पाटील, व मुख्याध्यापक अढाव सर व विक्की गायकवाड यांची योग्य चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरुन पुढील वर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे भरण्याची वेळ येवू नये असेही संदीप भगत यांनी तक्रारीत नमूद केले आहे.