‘मानसमित्र’ व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना मिळाले मानसिक आरोग्याचे धडे

0
26

एरंडोल महाविद्यालयात व्याख्यानमालेला मिळाला प्रतिसाद

साईमत/एरंडोल/प्रतिनिधी :

येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे डी. डी. एस. पी. महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्यावतीने चार दिवशीय “मानसमित्र” व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. तेव्हाच ते स्वतःचे व समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आयुष्यात जीवन कौशल्य करिअर प्लॅनिंग करताना खूपच उपयुक्त ठरतात, असे सांगितले.

व्याख्यानमालेत ‘लाईफ स्किल आणि करिअर प्लॅनिंग’ विषयावर मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व नंदुरबार येथील जी. टी. पी. कॉलेज कॉलेज येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश सूर्य, जळगावातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कीर्ती देशमुख यांनी “एडिक्शन: मानसिक डायट” विषयावर, जळगाव येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सतीश पाटील, “भविष्य वेद आणि व्यक्तिमत्व विकास” विषयावर पाचोरा येथील प्रा. डॉ. जितेंद्र बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परिश्रम

व्याख्यानमालेला डॉ. स्वाती शेलार होत्या. व्याख्यानमालेतील सत्रात उपप्राचार्य आर. एस. पाटील अध्यक्षपदी होते. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, प्रा. ए. टी. चिमकर, प्रा. एन. बी. गायकवाड, प्रा. जे. व्ही. पाटील, प्रा. व्ही. एस. वाघ, प्रा. एच. ए. अहिरराव, डॉ. शर्मिला गाडगे, प्रा. पल्लवी पाटील, प्रा. रेवती सोनवणे, प्रा. सपना पाटील, प्रा.पूनम पाटील यांचे सहकार्य लाभले. व्याख्यानमालेचा लाभ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी घेतला. व्याख्यानमालेचे आयोजन डॉ. सी. वाय. पाटील, डॉ. रेखा साळुंखे यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here