साईमत, जळगाव : प्रतिनिधी
रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावत आलेल्या फ्रान्स येथील पियर मारी व मेक्सिको येथील व्हिक्टर बाल्को हे दोन विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे. यावेळी रोटरी वेस्टच्या मानद सचिव मुनिरा तरवारी त्यांच्यासोबत होत्या.
गणेश चतुर्थीला नवीपेठ गणेश मंडळाची त्यांनी स्थापना मिरवणूक बघून त्यात सहभागी होत आनंद लुटला तर आशिष उपासनी, रवींद्र धुमाळ यांच्या निवासस्थानी गौरी अर्थात महालक्ष्मी पूजन व दर्शनासोबत त्यांनी आरती आणि भोजनाचा आस्वादही घेतला. आशिष अजमेरा यांच्या शाळेत इतर विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी भंडाऱ्याचा अनुभव घेतला. दीपा कक्कड व राधिका शर्मा यांच्या संस्थेच्या गणेश विसर्जनप्रसंगी उपस्थित राहून व्हिक्टर व पियर या दोघांनी या पद्धतीविषयी माहिती घेतली. भारतातील गणेशोत्सव हा ऐकून होतो, मात्र प्रत्यक्ष आम्हाला तो जळगावत येऊन अनुभवता येत आहे, असा आनंदही त्यांनी व्यक्त केला.