साईमत जळगाव प्रतिनिधी
विद्यार्थ्याना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण तसेच स्वानुभवातून शिक्षण देणे महत्वाचे ठरते.
याच उद्देश्याने प्रगती विद्यामंदिर शाळेतील उपक्रम शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देत त्यांचा कृत्युयुक्त सहभाग घेऊन त्यांना प्रकाश सरळ रेषेत प्रवास करत असतो हे पटवून दिले.
यात त्यांनी तीन सामान आकाराचे पुठठे घेऊन त्यांना सामान भागावर एक छिद्र पाडले. यानंतर ते तीन पुठठे एका सरळ रेषेत ठेवून त्यांचे छिद्र एका सरळ रेषेत येतील असे असा पद्धतीने ठेवले यानंतर एका बाजूला पेटती मेणबत्ती ठेवले व दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्यांला सांगितले कि त्या बाजूने छिद्रामध्ये बघ तुला मेणबत्तीची ज्योत दिसत आहे का? मुलाने हो सांगितले त्यानंतर त्यांनी मधील एक पुठ्ठा बाजूला सरकवला त्यानंतर परत बघायला सांगितले आणि विचारले आता तुला मेणबत्तीची ज्योत दिसत आहे का? मुलाने आता नाही असे सांगितले यावरून प्रकाशाचा मार्ग हा सरळ असतो हे सिद्ध झाले तसेच दुपारच्या वेळी खिडकी किंवा छतातून पडणारी प्रकाशाची झोत त्यात धुलिकन आपल्याला स्पष्ट दिसतात आणि या धुलिकणांमुळेच आपल्याला प्रकाशाचा मार्ग हा सरळ असतो हे लक्षात येते असे उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकाशाचे रेषीय संक्रमण होत असते असे अनुभवून दिले. या नावीन्यपूर्ण कृतीचे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापक संगीता गोहील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.