आदिवासी नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

0
39

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांची स्त्रीची भूमिका लक्षवेधी ठरली. १० वीच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य प्रमुख आकर्षण ठरले. काही विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास गाण्यातून व्यक्त केला. अध्यक्षस्थानी आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम.कोळी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक तसेच आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, श्रीमती मावळे, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे, केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे, केंद्रप्रमुख राजेंद्र गवते, संदीप वाघ उपस्थित होते. सुरुवातीला आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंंचलन करुन प्रमुख मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी आर्मी स्कूलचा माजी विद्यार्थी रोशन मावळे याने नेट परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्याचा परिवारासह मान्यवरांकडून जाहीर सत्कार आला. विद्यार्थ्यांचे जागतिक आदिवासी दिवसावर भाषण झाले.

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी आर्मी स्कूलचा उल्लेख निसर्ग रम्य शाळा म्हणून करुन विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाबाबत कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, पन्नालाल मावळे, प्रा. शाम पवार, प्राचार्य पी.एम.कोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस दिली. त्यांच्या नृत्याला, गाण्याला दाद दिली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बी.डी.पाटील तर शरद पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here