Seth L.N.Sa. School : शेठ ला.ना.सा. विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक ‘आकाशकंदील’

0
3

फटाके मुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी पर्यावरणपूरक दीपावलीचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील ६० विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षिका नीलिमा सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे रंगीबेरंगी आणि आकर्षक ‘आकाशकंदील’ स्वतःच्या हातांनी बनविले आणि शाळेच्या परिसरात लावले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, शिक्षक सोमनाथ महाजन, नीलिमा सपकाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात संजय वानखेडे यांनी दीपावलीतील विविध दिवसांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनी, वायू, जल आणि माती प्रदूषण तसेच व्यक्ती, पशू-पक्षी, निसर्ग आणि जलाशयांवर होणारे गंभीर परिणाम त्याची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त, शांत, स्वच्छ, प्रकाशमय आणि पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्तीची शपथ दिली.

चांगली पुस्तके अन्‌ आवश्यक वस्तू खरेदी करावे

फटाक्यांवर वायफळ खर्च करण्याऐवजी चांगली पुस्तके आणि आवश्यक वस्तू खरेदी करून स्वतःचा विकास करणे अधिक फायदेशीर ठरेल, असे ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ महाजन यांनी सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी शालेय सूचना दिल्या. यशस्वीतेसाठी नीलिमा सपकाळे, हिम्मत काळे, गौरव देशमुख, आनंद पाटील, किशोर माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here