साईमत, तळोदा : प्रतिनिधी
तळोदा तालुका मुलींच्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यागौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम आणि गौरव कनिष्ठ महाविद्यालय, आमलाडच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
१४ वर्ष वयोगटातील स्वाती कालुसिंग वसावे ही २०० मीटर धावणे प्रथम, मिनाक्षी सुनील मोरे ही १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तसेच १७ वर्ष वयोगटात २०० मीटर धावणे स्पर्धेत नंदिनी राजू ठाकरे प्रथम, सुस्मिता सुनील तडवी ही ४०० मीटर धावणे प्रथम व तेजस्विनी दीपक वळवी ही द्वितीय, लांबउडी स्पर्धेत नंदिनी राजू ठाकरे प्रथम तर तेजस्विनी दीपक वळवी द्वितीय, गोळाफेक स्पर्धेत रोहिणी कैलास वसावे प्रथम तर ४ X १०० मीटर रिल स्पर्धेत अश्विनी अमरसिंग पाडवी, तृप्ती ईश्वर वसावे, रोहिणी कैलास वसावे, सुस्मिता सुनील तडवी, स्नेहलता रायसिंग हे प्रथम आले. तसेच १९ वर्ष वयोगटात १०० मीटर व २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रियंका भरत पावरा प्रथम तर ४०० मीटर धावणे स्पर्धेत सावित्री रायसिंग वळवी प्रथम तर लांबउडी स्पर्धेत संजीवनी डोंगरसिंग पावरा प्रथम, गोळाफेक स्पर्धेत दर्शना सेल्या पाडवी प्रथम तर थाळीफेक स्पर्धेत संजीवनी डोंगरसिंग पावरा प्रथम आणि द्वितीय दर्शना सेल्या पाडवी यांनी विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविले. सर्वांची जिल्हास्तरावर निवड केली आहे. दर वर्षाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत. सर्व यशस्वी खेळाडूंना ललित पाठक, प्राचार्य विश्वास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक तथा क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.