Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक
    क्राईम

    वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक

    saimatBy saimatAugust 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    काश्मीर ः

    उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

    याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    एका वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे), ५०४ (जाणूनबुजून अपमान करणे), ५०६ (धमकावणे) आणि बाल न्यायाचं कलम ७५ (मुलांशी क्रूरता) अंतर्गत शिक्षक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.कठुआ येथील या प्रकारानंतर उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026

    Jalgaon:जळगावमध्ये ३४ जप्त वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च रोजी तहसील कार्यालयात

    March 5, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.