साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिवीगाळ आणि ९ रोजी शहरातील मुख्य चौकात झालेला भ्याड हल्ल्याच्या चाळीसगाव प्रेस क्लबच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील तसेच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना देण्यात आले. पत्रकार महाजन यांनी पोलीस स्थानकात तक्रार देऊनही पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, त्यांना अद्यापही संरक्षण मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
हल्ल्याचा निषेध करुन निवेदन प्रेस क्लबचे मुख्य प्रवर्तक किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लबचे अध्यक्ष रामलाल चौधरी, कार्याध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, सचिव गफार शेख, ज्येष्ठ पत्रकार भिकन वाणी, मोतीलाल अहिरे, गणेश पवार, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.राहुल जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार मुराद पटेल, स्वप्निल वडनेरे, मयूर अमृतकार, जीवन चव्हाण, सोजीलाल हाडपे, राकेश निकम, किशोर जाधव, रवींद्र कोष्टी, आनंद गांगुर्डे, दीपक सुराणा, ऋषीकेश बडदे यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.