ओझर पोलीसांची धडक कारवाई

0
15
ओझर-पोलीसांची-धडक-कारवाई

साईमत ओझर प्रतिनिधी

मुंबई आग्रा हायवेवर मालेगाव येथुन मुंबईला घेवुन जाणा-या छोटा हाथी गाडीत असलेले गोवंश जनावरांचे मांस पकडले. ४,६१,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त. मा. श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व विशेष पथकास दिलेले आहे.

सदर आदेशानुसार ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दुर्गेश एम तिवारी यांनी गुप्तबातमीदारामार्फत दिनांक २१.७.२०२३ रोजी २३.०० वाजता बातमी मिळाली की, मालेगाव येथून मुंबईकडे ईसम नामे सैय्यद मसुद रा. गांधीनगर मालेगाव हा त्याचे ताब्यातील TATA ACE छोटा हाथी गाडी क्र.एम एच ४६ वी एफ २९३२ हीचे मध्ये गोवंश जनावरांचे मांस घेवुन जात आहे बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पोलीस स्टाफला सोबत घेवुन रात्री ००.१० वाजेच्या सुमारास एच ए एल टाऊनशीप गेट नं. ३ समोर सापळा लावुन TATA ACE छोटा हाथी गाडी क्र.एम एच ४६ बी एफ २९३२ हि मालेगाव बाजुकडुन मुंबई बाजुकडे जात असतांना दिसल्याने नमुद छोटा हाथी वाहनास थांबबुन चालकास त्याचे नाव सैय्यद मसुद सैय्यद आलम वय ४० वर्ष रा. गांधीनगर मालेगाव असे सांगितले.

तेव्हा त्यास गाडीत काय आहे बाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर छोटा हाथी गाडी क्र. एम एच ४६ बी एफ २९३२ हिची पाठीमागे जावुन पाहणी केली असता एका काळ्या प्लास्टीकच्या कागदखाली निळ्या रंगाचे ०९ प्लॅस्टीक ड्रम मिळुन आल्याने सदरचे मांस कोठुन आणले याबाबत गाडीचालकास विचारले असता त्याने मालेगाव येथुन अमजद पुर्ण नाव माहीत नाही रा. मालेगाव याचे पत्र्याचे शेडमधुन मुंबई येथे घेवुन जात असल्याबाबत सांगितल्याने सदरचे मांस व छोटा हाथो गाडी असा एकुण ४,६१,०००/-रु. चा माल जप्त केला असुन यातील चालक सैय्यद मसुद सैय्यद आलम वय- ४० वर्ष रा.गांधीनगर मालेगाव यास अटक करण्यात आलेली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अंबादास गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री शहाजी उमाप पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मा. श्रीमती माधुरी केदार- कांगणे, मा.श्री सुनिल भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोहवा विश्वनाथ धारबळे, चालक पो.ना. मंगेश कर्डक, पोलीस शिपाई प्रसाद सुर्यवंशी, पोलीस शिपाई. राजेंद्र डंबाळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here