मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाची धडक कारवाई

0
27

साईमत जळगाव प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल दुपारी नेरी नाका स्मशानभूमीजवळील अतिक्रमीत घरांवर धडक कारवाई केली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाला रहिवाशांनी जोरदार विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता पथकाने अतिक्रमीत पक्क्या घरांवर जेसीबी चालवून ही घरे पाडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेरी नाका परिसरातील अतिक्रमीत घरे पाडण्यासाठी मनपाचे पथक आले असतांना रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र शनिपेठ पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अखरे जेसीबीच्या मदतीने अतिक्रमीत केलेली घरे व कंपाऊंड तोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here