साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुरटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतांना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला करून उपोषणकर्त्यांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्यावतीने तोंडापूर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. दोषींवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावातील घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे मराठा समाजाच्या सर्व संघटनाच्यावतीने टायर जाळून निषेध करण्यात आला. त्याचबरोबर दोषीवर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी, अन्यथा मराठा समाज तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा दिला आहे. या मागणीसाठी तोंडापूर गाव हे शंभर टक्के बंद करून सरकारचा निषेध केला आहे.