साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ताण, तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.व्ही.काटे होते.
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी समजून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थी जास्तीत जास्त तणावमुक्त राहुन परीक्षा देतील. अशा प्रकारे सहाय्य केले पाहिजे, असे मत उपप्राचार्य डॉ. ए.व्ही.काटे यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ता म्हणून उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या सादरीकरणात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय परीक्षांमध्ये विद्यार्थी तणाव मुक्त परीक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा कशी देतील, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ राहुल कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. के. एस. खापर्डे उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात डॉ. अभय डी. शेळके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्टे सांगितली. सूत्रसंचालन प्रा. सौ. व्ही. आर. पाटील तर आभार प्रा. डी. बी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.आर.आर.बोरसे, प्रा.एन. एम. नन्नवरे, डॉ.व्ही.डी.चौधरी, डॉ.पूनम निकम आदी उपस्थित होते.