साईमत जळगाव प्रतिनिधी
आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव उपाय आहे आणि तो सध्याच्या शिक्षण पद्धतीत आध्यात्मिक शिक्षणाचा समावेशानेच पूर्ण होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजक, शिक्षण प्रभाग, माऊंट आबू यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियान आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन येथील ढाके कॉलनी सेवाकेंद्रात आयोजि करण्यात आले. त्याप्रसंगी सुमनदीदी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, अगदी कोवळया वयातील विद्याथ्र्यांच्या आत्महत्येच्या घटना पाहता मन व्यथित होते, जीवनाचा प्रारंभ करण्यापूर्वीच त्याला न समजून घेता आत्महत्या करणा·या मुलांना कसे समजावे असा प्रश्न पालकांना पडलेला आहे. कमजोर मन असणे हे आत्महत्येचे सर्वांत मोठे कारण सांगता येईल, त्यासाठी शिक्षण पद्धतील प्रचलित विषयांबरोबर मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश असणे ज्या योगे मन सशक्त होईल हाच एक महत्वाचा उपाय आहे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी मणियार लॉ कॉलेजचे प्राचार्य युवाकुमार रेड्डी, उज्ज्वल इग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्रा. मानसी गगडानी, ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी , प्रा. विकास साळुंखे ( नोडल सेंटर, नाशिक), नरेशभाई ( शिक्षा प्रभाग सदस्य, सिकर राजस्थान ), प्राचार्य डॉ. ममता शर्मा ( विवेकानंद कला महाविद्यालय, अहमदाबाद), प्रकाश सोनवणे आदिंची उपस्थिती होती. या प्रसंगी मूल्यशिक्षणात उत्तीर्ण विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
आभार प्रदर्शन डॉ. विजय पाटील यांनी केले. अभ्यासक्रमांचा परिचय पकंज पाटील यांनी करुन दिला. ब्रह्माकुमारी हेमलता यांनी सूत्रसंचलन केले.