कोटंबी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

0
10

साईमत, नाशिक: प्रतिनिधी

पेठ मार्गावरील अपघातप्रवण कोटंबी घाटातील वळणावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. ही वाहने आपसात धडकल्याने वाहतूक बंद पडली आहे.

सततच्या पावसामुळे या मार्गावरील सावळघाट व कोटंबी घाट वाहनांसाठी धोकादायक झालेले असतानाच शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नाशिककडे जेसीबी घेऊन जाणारा ट्रक आणि पेठकडे येणारा आयशर ट्रकवर जेसीबी उलटला. दोन्ही वाहनांवर टँकर धडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातामध्ये सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here