महामार्गावरून धावणाऱ्या बसेसला रोहिणी, हिरापूर, खडकीला थांबा द्या

0
22

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

तालुक्यातील रोहिणी, हिरापूर, खडकी येथून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालयात चाळीसगाव येथे येत असतात. मात्र, चांदवड-जळगाव महामार्गावरून अनेक बसेस रोहिणी, हिरापूर, खडकी या बस थांब्यावर न थांबता धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसने प्रवास करता येत नाही. बस थांबत नसल्यामुळे शाळा, महाविद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे चांदवड-जळगाव महामार्गावरून धावणाऱ्या सर्व बसेसला रोहिणी, हिरापूर, खडकी बस थांब्यावर थांबा देण्याची रयत सेनेने आगार व्यवस्थापकांकडे १६ जुलै रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सकाळी ६ वाजेपासून विद्यार्थी हिरापूर, खडकी बस थांब्यावर येऊन बस थांबण्याची गेल्या चार दिवसांपासून वाट पाहत असूनही थांब्यावर एकही बस विद्यार्थ्यांसाठी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही बसेस थांबत असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू दिले जात नाही. मागून येणाऱ्या बसमधून येण्याचे बस वाहक (कंडक्टर) सांगतात. अशात शाळा महाविद्यालयात वेळेवर जाण्यास विद्यार्थ्यांना वेळ लागतो. म्हणून आपण या महामार्गावरून धावणाऱ्या बसेसला रोहिणी, हिरापूर व खडकी बस थांब्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी थांबा देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासावे. अन्यथा आपल्या एसटी आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रयत सेना चक्काजाम आंदोलन करेल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी चाळीसगाव आगार व्यवस्थापक जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेने आगार व्यवस्थापक मयूर पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरूड, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश धुमाळ, विद्यार्थी साई निकुंभ, मोहन दाभाडे, प्रथमेश निकुंभ, निखिल हांडे, नितेश पाटील, महेंद्र पारधी, निलेश पाटील, धीरज मोरे, विवेक वानखेडे, कृष्णा सैंदाणे, गणेश इंगळे, शुभम साळुंखे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here