चिनावलला किरकोळ कारणावरुन दगडफेक

0
15

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

चिनावल गावात एका ट्रॅक्टर व दुचाकी चालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. त्यानंतर यादरम्यान काही जणांनी चिनावल येथे महादेव वाडा, महाजन वाडा आणि वाणगल्ली भागात दगडफेक केली. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. तसेच एका महिलेचे मंगळसूत्रही लांबविण्यात आले. ही घटना शुक्रवारी १७ मे रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चिनावल गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. परिणामी गावात तणावपूर्ण शांतता आहे. सद्यस्थितीला चिनावल गावात १८ मे रोजी १ वाजेपासून ते २० मे २०२४ रोजी १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींसह १५० ते २०० यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. यापैकी निसार डॉक्टर आणि शमशोद्दीन उर्फ समा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दगडफेकीची घटना घडताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी चिनावल पोलीस चौकीसमोर जमत तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले आणि आरोपींना अटकेची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिक व महिलांची भेट घेऊन २४ तासात आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. तसेच ट्रॅक्टर व दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या वादामुळे चिनावल येथे दोन समाजाचे लोकांकडून दगडफेक झाल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावरून सांगितले. याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखावी, असे आव्हान नखाते यांनी केले आहे.

दगडफेकीत रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक मजहर खान पठाण यांच्या पोटावर एक विट लागल्याने तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला, अशा फिर्यादीवरुन शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, फैजान इरफान शेख, मोहीत विलास महाजन, निसार डॉक्टर (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर १० ते १५ (सर्व रा.चिनावल) यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चिनावल गावातील महादेव वाडा ते मेस्को वाडा यास जोड रस्त्याच्या बोळीतून शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, हयात खान वाहेद खान, शेख नजीर शेख बशीर, निसार(डॉक्टर पूर्ण नाव माहीत नाही) हे पळत आले. त्यांच्या मागे बरेच लोक होते. त्यांनी रस्त्यावरील दुचाकींचे नुकसान केले. रस्त्यावर वॉकिंग करित असलेल्या दोन्ही महिला रस्त्याचे बाजू झाले असता १ ते ४ यांनी फिर्यादी महिला माधुरी युवराज महाजन गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून घेतली. यावेळी प्रतिकार करणारी महिला वर्षा महाजन यांच्या अंगावरील झंपरही फाडले.

या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी रेड्डी, जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, फैजपूरचे सहा. पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पिंगळे यांनी रात्रीच भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here