Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेरात मुक्काम ठोका अन्‌ मला पराभूत करुन दाखवा
    जामनेर

    जामनेरात मुक्काम ठोका अन्‌ मला पराभूत करुन दाखवा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजपाच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांचे एकनाथराव खडसेंना आव्हान

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    जिल्ह्यात विकासाची कामे ‘मी’ केले आहे. जामनेर तालुक्यात धरणांची कामे ‘मी’ केली, रस्ते ‘मी’ केले असे, ‘मी’ केले म्हणणारे एकनाथराव खडसे यांच्यात ‘मी’ पणा ठासून ठासून भरला आहे. अशा ‘मी’ पणाचे एक वेळा गर्वहरण होते. मग तुमच्या बोदवड तालुक्याला महिनाेन्‌ महिने पाणी का मिळत नाही. अगोदर पाणीटंचाई सोडवा, मग विकासाच्या गोष्टी करा. स्वतःची ग्रामपंचायत सांभाळू न शकणारे खडसे जामनेरच्या विकासावर बोलतात ही मोठी शोकांतिका आहे. जर मला पराभूत करायचे असेल तर जामनेरातच मुक्काम ठोका आणि मला पराभूत करुन दाखवा, असे थेट आव्हान मंत्री गिरीष महाजन यांनी आ. खडसेंना दिले आहे. येथील पाचोरा रस्त्यालगतच्या बाबाजी राघो मंगल कार्यालयात पार पडलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांनी माजी मंत्री आ.एकनाथ खडसेंवर टीका करत खडसेंना थेट आव्हान दिले आहे.

    मंत्री महाजन पुढे म्हणाले की, तुमच्या तालुक्यात तुमची दाळ शिजत नाही आणि आमच्याकडे येऊन काय दाळ शिजवताय? असाही प्रश्न उपस्थित करुन इकडचे पाणीच वेगळे आहे. उठले की तेच तेच बोलतात मग तुमची नार्को टेस्ट करा. सोबत माझीही करा. लगेच कळेल ‘दूध का दूध… पाणी का पाणी…’ असाही टोलाही मंत्री महाजन यांनी लगावला.

    यांची होती उपस्थिती

    ही बैठक भाजपा नेते खा. बंशीलालजी गुर्जर, आ.आशिषभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ॲड.शिवाजी सोनार, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, शेंदुर्णीचे संजय गरूड, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, आतिष झाल्टे, रवींद्र झाल्टे, नवलसिंग पाटील, विलास राजपूत, सुहास पाटील, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.