त्यांनी वर्षा सोडलं, आमदार सोडले, पण पवारांना सोडले नाही – गुलाबराव पाटलांचा पलटवार

0
14

मुंबई : त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला ५२ आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहीतील बैठकीत व्यक्त केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे. आपल्यावर भरपूर टीका झाली. आपले बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा वापरली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही. संजय राऊतांना आमची राजकीय वाटचाल त्यांना माहीत नाही. १९९२च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. कलम ५६ काय असते ३०२ काय असते हे राऊतांना माहीत नाही. हे आम्ही सर्वांनी भोगलं आहे. तडीपाऱ्या काय असतात, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असंत हे त्यांना माहीत नाही. ते बाळासाहेबांचे फोटो लावून मोठे झाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

आमची परिस्थिती काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळाले. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही मोठा त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू. आमच्या यशात शिवसेनेचा ८० टक्के वाटा आहे. पण २० टक्के आमचाही मेहनत आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवत होतो. राऊतांनी ४७ डिग्री सेल्सिअस तापमानात जळगावात येऊन ३५ लग्न लावावेत. मी त्यांना बहाद्दर म्हणेल. त्याकाळात आम्हीच लग्न लावत असतो, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here