महोत्सवात महिला संत करणार कीर्तन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
शहरातील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे जारगाव शिवारातील वारकरी भवनात दरवर्षीप्रमाणे विश्व माऊली ज्ञानोबाराय समाधी संजीवन सोहळा व लक्ष्मी मातेच्या मार्गशीर्ष महिन्यातील उत्सवानिमित्त २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय महिला वारकरी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार, झी टॉकीज टीव्ही स्टार, युवा महिला कीर्तनकार येणार आहे.
गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी मोनालीताई महाजन श्रीरामपूरकर यांचे कीर्तन पार पडले. २९ ला अंजलीताई शिंदे निफाडकर, ३० ला रेणुकाताई जाधव चिखली, बुलढाणा, १ डिसेंबर रोजी साध्वी सर्वेश्वरीदीदी नांदुरा, २ ला कल्याणीताई निकम थेटाळे, नाशिक, ३ ला भागवताचार्य रोहिणीताई ठाकरे चांदवड, ४ ला भागवताचार्य ज्ञानेश्वरीताई बागुल, नाशिक, ५ ला काल्याचे किर्तन दिवशी भागवताचार्य वृशप्रियाताई वाघ, निंभोरा, ता.कन्नड आदी महिला संतांचे कीर्तनाचे आयोजन केले आहे.
कीर्तन महोत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
गायनासाठी महाराष्ट्रातील नामवंत रूपालीताई गायधनी, पूजाताई भोर, मृदंगसम्राट अश्विनीताई मतसागर उपस्थित राहणार आहेत. कीर्तन महोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्थेचे भागवताचार्य योगेश महाराज धामनगावकर, ह.भ.प. सुनीताताई पाटील, धामणगावकर यांनी केले आहे.