सोहळ्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उदघाट्न
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती होते, हा व्यापक दृष्टिकोन ठेवून जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान या मान्यता प्राप्त सामाजिक संस्थेतर्फे राज्यात विविध क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या कर्मवीरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या रविवारी, ११ मे रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठानच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छापत्र देऊन कौतुक केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असतील.
यांची असेल प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवार, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी.कोळी, उपाध्यक्ष जयसिंग सोनवणे, सचिव शालिनी सैंदाणे यांनी केले आहे.