साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जळगाव शहरामध्ये राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली.
या चाचणीमध्ये इयत्ता तिसरी सहावी तसेच नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित या विषयाची चाचणी घेण्यात आली. पायाभूत स्तर तपासण्यासाठी इयत्ता ३ री ,प्राथमिक स्तर तपासण्यासाठी इयत्ता सहावी तर मध्यस्थर तपासण्यासाठी इयत्ता ९ वी च्या वर्गाची ही परीक्षा घेण्यात आली.
सदर परीक्षेत प्रत्येक वर्गासाठी एकूण ३० विद्यार्थी प्रमाणे मनपा क्षेत्रासाठी ९० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सदर चाचणी साठी समाजकार्य विभाग चे विद्यार्थी उ.म.वि.जळगावचे क्षेत्रीय अन्वेषक यांचे अनमोल सहकार्य लाभले तर परीक्षेसाठी मुख्य समन्वयक म्हणून दिपाली पाटील ( प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण मंडळ जळगाव) , तर सह समन्वयक म्हणून अश्विनी पाटील , समाधान माळी, शरद कोळी, भारती चौधरी तसेच समावेशित शिक्षण विभाग समग्र शिक्षा यांनी कामकाज पाहिले.