साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगांव दि २६(प्रतिनिधी )राज्य परिवहन मंडळाच्या सोयगांव आगारात ४० बसेस चालवीण्यासाठी ७६ चालक आहे परंतु चालक मात्र २९ आहे. त्यामुळे आगाराला उत्पन्न आणि प्रवाशांना सेवा देणाऱ्या महत्वाच्या बसफेऱ्या वाहका आभावी बंद कराव्या लागल्याचे समोर आले असून प्रशिक्षण देऊन चालकांनाच वाहक करण्याचा प्रस्ताव आगाराने दिला आहे.
सोयगांव एस टी आगाराच्या सोयगांव ते अकोला व सोयगांव ते पिशोर या बसफेऱ्या चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या आहे.परंतु सध्या या बसफेऱ्या बंद आहे. पिशोर मुक्कामी जाणारी बस आगार स्थापने पासून आहे. परंतु ती बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोयगांव अकोला ही बुलढाणा, शेगाव जाणाऱ्या प्रवाशांसाठी अंत्यत सोयीची बस बंद असल्यामुळे या मार्गावर प्रवास करतांना हाल होत आहे. दोन्ही बससेवा सुरु करण्याबाबत नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती कुसुम राजू दुतोंडे यांनी आगार प्रमुखांस निवेदन दिले.भगवान पंडित, राजू दुतोंडे, रामदास घणगाव, अमोल मापारी, पूनम परदेशीं यांच्या निवेदनावर सह्या आहे.त्यावर आगार व्यपास्थापक हिरालाल ठाकरे यांनी सांगितले की सोयगांव आगारात ४० बसेस चालवीण्यासाठी ७६ ड्रायव्हर आहेत परंतु कंडकटर मात्र २९ च आहे त्यामुळे अनेक बसफेऱ्या बंद कराव्या लागत आहे. किमान २५ वाहक अजून मिळाले तर सर्व बसफेऱ्या सुरु करता येतील अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
चालकांना वाहक करा
सोयगांव आगारात वाहक कमी आहे. त्यात एस टी त नवीन वाहक भरती झालेली नाही त्यामुळे वाहक मिळणे मुश्किल आहे त्याकरिता चालकांनाच प्रशिक्षण देऊन वाहक करण्यात यावे असा प्रस्ताव आगाराने विभागीय नियंत्रक यांना दिला आहे सोयगांव ला वाहक मिळण्यासाठी हा प्रस्ताव योग्य असून याचा पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका कुसुम राजू दुतोंडे यांनी सांगितले.