साईमत, शिंदखेडा ( प्रतिनिधी )
शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधत भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याव्ोळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी.आय. दिपक पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. टी. राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, प्रा. आर. के. पवार, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक प्रशांत जाधव उपस्थित होते. स्पर्धेला हिरवा झेंडा पी.आय. दिपक पाटील यांनी दाखवला.
स्पर्धेत स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यात प्रथम – कुणाल ईश्वरसिंग गिरासे – द्वितीय, कृष्णा गोरख कोळी – तृतीय, प्रेम रतिलाल बागले तर मुलींमधून पुनम खंडू माळी प्रथम, मनीषा मनोहर बोरसे – द्वितीय, पूजा संजय पाटील तृतीय क्रमांक पटकावला. विजय स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक राहुल पाटील, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले.