साईमत, प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी हे पद गेल्या चार महिन्यापासून रिक्त होते. या पदावर वर्धाहून सोपान कासार यांची शासनाने नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आपल्या कार्याचा पदभार घेतल्यावर शहरातील अल्पसंख्याक समाजातील क्रीडा, राजकीय, सामाजिक व बिरादरीतर्फे प्रातनिधिक स्वरूपात त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व साने गुरुजी लिखित इस्लाम दर्शन हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरी तथा क्रीडा संघटनांतर्फे फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, भुसावळचे माजी नगर अध्यक्ष मुन्ना तेली, हुसैनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अनवर सिकलगर, रंगरेज बिरादरीचे दानिश रंगरेज, उस्मानिया पार्कचे समीर शेख व मिर्झा चौक शिवाजी नगचे प्रमुख राजा मिर्झा यांचा समावेश होता.