साईमत, जळगाव : प्रतिनिधी
खुबचंद सागरमल विद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रीय हॉकीचे खेळाडू प्रा.इकबाल मिर्झा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर खेळाडुंचा सत्कार आणि मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश आदिवाल, प्रा.इकबाल मिर्झा, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, एल.एन.महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर योगीनी बेंडाळे, क्रीडा विभाग प्रमुख विजय पवार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनील साळवे, मयूर पाटील, संतोष चौधरी, राजेश इंगळे यांनी परिश्रम घेतले.
