रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांनी गाजवल्या

0
10

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी स्पोर्ट अ‍ॅन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पहिला आणि दुसरा दिवस कॅरम, चेस, स्विमिंग, स्पीड स्केटिंग व बास्केटबॉल या विविध स्पर्धेत विध्यार्थ्यानी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे गाजला.

शनिवार जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा दुसरा दिवस असून, रविवार रोजी सकाळी ११ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यंदा काय नवे पाहायला मिळणार याकडे जिल्हाभरातील हजारो क्रीडाप्रेमीचे लक्ष लागून आहे.
या स्पर्धेत यंदा रुस्तमजी‎ इंटरनॅशनल स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ओरियन स्कूल, पोद्दार स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, जिजामाता स्कूल, गुरुकुल स्कूल, सेंट तेरेसा स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, अनुभूती स्कूल, बोहरा‎ इंटरनॅशनल स्कूल, एसजीएस हायस्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, बालविश्व स्कूल यासह पाचोरा व एरंडोल येथील विविध स्कूलमधील ३५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग आहे.
विजेत्यांना १० हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या विविध स्पर्धाचे परीक्षण प्रवीण ठाकरे- बुद्धिबळ, आयशा खान- कॅरम व बबलू पाटील- बास्केटबॉल हे करीत असून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट अ‍ॅन्ड कल्चरल फाउंडेशन व मार्केटिंग प्रमुख अमिता सिंग, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे, क्रीडाशिक्षक संजय चव्हाण व कमलेश नगरकर हे सहकार्य करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here