साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डायमंड शाळेत क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. त्यात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ह्या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन उत्कृष्ट नियोजन करुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डायमंड शाळेचे अध्यक्ष डॉ.हाजी हारूण सेठ होते.
यावेळी १०० मीटर धावाच्या स्पर्धेला सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. तसेच ५० मीटर धावाला फैजपूर येथील सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ तर मुलींच्या ५० मीटर धाव स्पर्धेला फैजपूर येथील पोलीस उपनिरीक्षक सय्यद मैनुद्दीन यांनी हिरवा झेंडा दाखविला. कबड्डीच्या स्पर्धेसाठी सावदाचे माजी नगरसेवक डॉ.अजित कुमार पाटील यांनी नाणेफेक केली.
सुरुवातीला मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना आपण चांगले खेळाडू म्हणून मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना वेगळे आरक्षण दिले आहे.
याप्रसंगी हाजी हारून सेठ फाउंडेशनचे अध्यक्ष नाजिम शेख, डायरेक्टर प्रोफेसर मोहसिन, सुपरवाइजर समन, प्राचार्य शेहरा सरोटा, क्रीडा शिक्षिका प्रेरणा सोनवणे, नदीम, अक्रम, सागर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल मेढे तर आभार क्रीडा शिक्षक वासिम यांनी मानले.