साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या स्थापनेनिमित्त झालेल्या भजन संध्येला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पालकमंत्री यांनीही भजन म्हणून भाविकांचा उत्साह वाढविला.
श्रीराम मंदिर स्थापनेनिमित्त येथे पवन झवर आणि विनोद बलदवा यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम प्रतापराव पाटील, उदय झवर, अमोल कासट, जीपीएस मित्र परिवाराने आयोजित केला होता. यावेळी राम, हनुमान यांचे भजन ऐकून तरुणाई थिरकली तर भजनांना महिला वर्गानेही दाद दिली.
कार्यक्रम सुरू असतानाच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले आणि भजनाचा आनंद घेता घेता त्यांनाही भजन म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी’ हे भजन म्हटले. त्यांनी गायिलेल्या भजनालाही भाविकांनी भरभरून दाद दिली. भाविकांची भजनाला झालेली गर्दी लक्षणीय होती.