साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थ्यांसाठी शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘स्पेल्ल्याथोन’ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्होक्याबुलरी आदी मुद्द्यावर आधारित १०० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात ३०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आर.आर.बोरसे त्यांचे सहकारी प्रा. डॉ.प्रशांत पाटील, प्रा.प्रतीक अग्रवाल, प्रा.अंकुश जाधव तसेच सेवक रघुनाथ खलाल यांनी परिश्रम घेतले.