अहुजा नगरात किरकोळ अपघात,
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
जळगाव शहरातील अहुजा नगर परिसरात बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) दुपारी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने पुढील बसला जोरदार धडक दिल्याने किरकोळ अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल अभिमन सपकाळे (वय ३९, रा. बांभोरी, ता. धरणगाव) हे बुधवारी दुपारी १ वाजता बस क्रमांक एमएच १४ एमएन २९९० घेऊन जळगावहून धुळे रस्त्याने प्रवास करीत होते. जळगाव शहरातील अहुजा नगर येथील एकविरा हॉटेलजवळून बस जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ३४० ने बसला धडक दिली. धडकेचा जोर मोठा असला तरी चालकाची प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातात बसच्या काचा फुटून किरकोळ नुकसान झाले. मात्र बसमधील प्रवासी व चालक सुरक्षित राहिले. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी बस चालक सुनिल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक विजयकुमार दिनेश साकेत (रा. सतना, मध्यप्रदेश) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण पाटील
