Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»देश-विदेश»Indian Railway special trains: ‘उर्स फेस्टिव्हल’ सणासाठी रेल्वे प्रशासनाची खास तयारी; तिकीट लवकर बुक करा!
    देश-विदेश

    Indian Railway special trains: ‘उर्स फेस्टिव्हल’ सणासाठी रेल्वे प्रशासनाची खास तयारी; तिकीट लवकर बुक करा!

    SaimatBy SaimatDecember 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Railway special trains
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत वृत्तसेवा

    अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच अजमेर येथील प्रसिद्ध ‘उर्स फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तीन महत्वाच्या मार्गांवर विशेष भाड्याने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांमुळे उत्सव आणि गर्दीच्या काळात प्रवाशांना आरामदायी आणि सुरळीत प्रवासाची संधी मिळणार आहे.

    मच्छलीपट्टणम–अजमेर विशेष गाडी क्रमांक ०७२७४, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मच्छलीपट्टणम येथून प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता अजमेर येथे पोहोचेल. परत जाणारी गाडी क्रमांक ०७२७५ २८ डिसेंबर रोजी अजमेरहून सकाळी ८.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मच्छलीपट्टणममध्ये ९.३० वाजता पोहोचेल. या गाड्याला प्रवासादरम्यान ३० हून अधिक स्थानकांवर थांबे असणार आहेत, ज्यात गुडीवाडा, विजयवाडा, नांदेड, भोपाळ, उज्जैन, चित्तोडगड आणि भिलवाडा यांचा समावेश आहे.

    काचीगुडा–मदार मार्गावरही विशेष गाड्या क्रमांक ०७७३३ आणि ०७७३४ २३ आणि २८ डिसेंबर रोजी धावणार आहेत. ही गाड्या क्रमशः काचीगुडा ते मदार आणि मदार ते काचीगुडा दरम्यान प्रवास करतील, आणि मार्गावर मलकाजगिरी, अकोला, नांदेड, रतलाम, मंदसौर व अजमेरसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.

    याशिवाय हैदराबाद–अजमेर–हैदराबाद मार्गावरही विशेष सेवा चालवली जाणार आहे. हैदराबाद ते अजमेर गाडी क्रमांक ०७७३१ २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हैदराबादहून प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता अजमेर पोहोचेल. परत जाणारी गाडी क्रमांक ०७७३२ २७ डिसेंबर रोजी अजमेरहून रात्री ६.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता हैदराबादमध्ये पोहोचेल. या गाड्याही प्रवासादरम्यान ३० हून अधिक स्थानकांवर थांबणार आहेत.

    रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, विशेष गाड्यांच्या थांब्यांची आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी आणि या सेवांचा फायदा घ्यावा. उत्सवाच्या काळात प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी ही विशेष व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    IAS Tina Dabi : प्रशासन विरुद्ध विद्यार्थी संघर्षाला राजकीय रंग; टीना डाबी प्रकरणावर चतुर्वेदींची स्पष्ट भूमिका

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.