Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा
    जळगाव

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    saimatBy saimatMarch 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Special employment and counseling meet for ex-servicemen
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उद्याच्या मेळाव्यात माजी सैनिकांना थेट रोजगार व मार्गदर्शन

    साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी

    जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या नवे क्षितिज उघडण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि जिल्हा सैनिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा आयोजित केला जात आहे.

    हा मेळावा बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माजी सैनिक मायादेवी बहुउद्देशीय सभागृह, महाबळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

    मेळाव्यात स्टार फॅबरीक्स आणि छबी इलेक्ट्रिकल यांसारख्या उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींकडून इच्छुक उमेदवारांची जागेवरच मुलाखत घेऊन थेट निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळवण्याची सोपी आणि जलद संधी उपलब्ध होणार आहे.

    मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी राज्य शासनाच्या महा-स्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही, त्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांसह थेट मेळाव्यास हजर राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी सांगितले.

    या मेळाव्याद्वारे केवळ रोजगाराच्या संधीच नाहीत, तर माजी सैनिकांना करिअरविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशनही उपलब्ध होणार आहे. आयोजकांनी सर्व माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

    या मेळाव्यामुळे माजी सैनिकांच्या करिअरमध्ये नवीन वळण येईल, तसेच त्यांना त्यांच्या कौशल्यांचा योग्य उपयोग करून सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधता येईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Jalgaon:जळगावात मोठी कारवाई ठरली स्लॉटर हाऊस परिसरातील झोपड्या हटणार

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.