Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon:आयोध्या नगरमध्ये रामनवमी शोभायात्रेपूर्वी विशेष स्वच्छता मोहीम
    जळगाव

    Jalgaon:आयोध्या नगरमध्ये रामनवमी शोभायात्रेपूर्वी विशेष स्वच्छता मोहीम

    saimatBy saimatMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Special cleanliness drive in Ayodhya Nagar before Ram Navami procession
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शोभायात्रा मार्ग सजावटीसाठी मनपा व नागरिक पुढाकारावर

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    प्रभू श्रीराम नवमी आणि भगवे हिंदू संमेलनाच्या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६, आयोध्या नगर परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

    मनपा आरोग्य विभागाच्या समन्वयाने रस्ते स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली. शोभायात्रेच्या मार्गावर सद्गुरु नगर दत्त मंदिरापासून सागर शॉपी, तृप्ती कॉर्नर ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्यांवर गटारांची साफसफाई, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढणे आणि झाडू मारून परिसर स्वच्छ करण्यात आला. या कामामुळे शोभायात्रेसाठी मार्ग अधिक आकर्षक आणि सुरक्षीत झाला आहे.

    या मोहिमेसाठी भाजपचे नगरसेवक डॉ. विरण सुरेश खडके आणि भाजपचे कोषाध्यक्ष विजय वानखेडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या समन्वयातून मनपा आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कामे पूर्ण केली. आगामी धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षीत वातावरण मिळावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.

    यावेळी माजी नगरसेवक प्रदीप रोटे, शिंदे सेनेचे हर्षल मावळे तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सोनगीरे यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छतेसाठी सहकार्य केले आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

    रामनवमीच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने प्रशासनानेही आवश्यक तयारी सुरू केली आहे. स्वच्छता मोहिमेमुळे शोभायात्रेचा मार्ग सुकर आणि आकर्षक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव महामार्ग अतिक्रमणमुक्त होणार; वाहनधारकांना ७ दिवसांचे अल्टिमेटम

    March 26, 2026

    Jalgaon : आव्हाणे रोडवर धाडसी चोरी; ‘नाईट किंग’ बारमधून विदेशी दारू लंपास

    March 26, 2026

    Jalgaon : जळगावमध्ये उष्णतेची तीव्र लाट; नागरिक आणि शेतकरी त्रस्त

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.