साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सोमवार दिनांक २८, नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे तीन टेबलावर सहा कर्मचारी नाम निर्देशनपत्र स्वीकारतील अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
सोयगाव तालुक्यात वरखेडी(खु)ठाणा, सावरखेड- लेनापूर,घोरकुंड,कंकराळा-रावेरी आणि वाडी-सुतांडा- नायगाव या पाच ग्रामपंचायत साठी सोमवारी दिनांक २८ ते २ डिसेंबर पर्यंत नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत आहे दरम्यान या पाचही ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असून पाच पैकी वरखेडी ठाणा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला, सावरखेडा सर्वसाधारण महिला आणि वाडी नायगाव सर्वसाधारण महिला सरपंच पद राखीव झाले असून या पाच ग्रामपंचायतीसाठी तुरस वाढणार आहे कंकराळा-रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीकडे राखीव झाले असून वनगाव-घोरकुंड ही ग्रामपंचायत नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखीव आहे त्यामुळे कंकराळा वगळता सर्वच ठिकाणी चूरस पहावयास मिळणार आहे.
६ हजार ७४ मतदार हक्क बजावणार
पाच ग्रामपंचायतीमध्ये ६ हजार ७४ मतदार हक्क बजावणार आहेत तर सरपंच पद थेट जनतेतून असल्याने सरपंच पदासाठी वेगळे मतदान करावे लागणार आहे राजकीय पक्षांनी सदस्यांच्या ऐवजी सरपंचपदाच्या उमेदवारासाठी कस लावला आहे त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील गाव कारभारी म्हणून तीन ग्रामपंचायती मध्ये महिला राज येणार आहे.
कंकराळा ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत
कंकराळा ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेच्या आमखेडा गटात असून ग्रामपंचायतची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटाकडे राखीव झाले आहे, याठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे.