साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव :
पिंप्राळा परिसरातील सोनी नगरकडे सावखेडा जाणाऱ्या रस्त्यावर चैतन्य किराणा दुकानासमोर नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पाण्यातून वाहुन येणारे साप नागरिकांच्या घरात येत असल्याने महिलांमध्ये भीती पसरली आहे. रस्त्याच्या कामाचा आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. ठेकेदाराने रस्त्यावर खडी टाकुन ठेवली आहे. मात्र, काम का रखडले? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तलावातून जाणाऱ्या वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक पावसात सावखेडा, सोनी नगर, बाबुराव नगर, श्रीराम नगर, ओंकार पार्क, गणपती नगरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सावखेडा रस्ता मंजूर झाला असून रस्त्यावर खडी टाकुन ठेवली आहे. मात्र, अपूर्ण काम सोडून दिल्याने काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.