सैनिकांनी देशसेवा करत असतानाचे प्रसंगाचे केले कथन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवडानिमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सैनिकांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आले. त्यांचे अनुभव महसुलसाठी कसे प्रेरणादायी ठरतील, याबाबत हितगुज करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक किशोर पाटील, कृष्णा डकले, रघुनाथ चौधरी, प्यारेलाल महाजन, राजेश देवळे, बुध्दशील सोनवणे, के. एम. राजपूत, काशिनाथ शिंदे, मंडळ अधिकारी जामनेर विजय पाटील, विष्णू पाटील, तलाठी नितीन मनोरे, आप्पा कोतवाल, संतोष कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी सैनिकांनी देशसेवा करत असतानाचे प्रसंग सांगितले. कारगील लढाईचे प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे प्रसंग कथन केले. यावेळी मंडळ अधिकारी विष्णू पाटील यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग ऐकुन सैनिकांचा मान, सन्मान वाढविला. त्याबद्दल सैनिकांनी कौतुक केले.