लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या ‘माणुसकी समुहा’चे समाजसेवक सुमित पंडित आणि समाजसेविका पूजा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच जामनेर येथे सन्मानित करण्यात आले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन गौरविण्यात आले. संत सेना महाराज बहुद्देशिय सेवाभावी संस्था आणि संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र निलपगारे होते. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष वसंतराव साळुंखे तसेच ‘माणुसकी समुहा’चेे देविदास पंडित, मिराबाई पंडित, लक्ष्मी पंडित, राम पंडित आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी जिल्हा युवकाध्यक्ष अनिल शिंदे, जामनेर तालुका युवकाध्यक्ष जयवंत पर्वते, किशोर वाघ, संजय सोनवणे, नाना पवार, सुनील शिंदे, प्रवीण बोढरे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ऑल इंडिया सेना समाजाचे सचिव राजकुमार गवळी यांनी केले.