साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगावं परिसर ग्रुप चा असाही आदर्श कजगाव ता भडगाव सोशल मीडिया म्हणजे फक्त मेसेज देवाण घेवाण व एक मौज मजेचा विषय म्हणून पहिला जातो बऱ्याच वेळेस सोशल मिडीयावर विविध अफवेला उत आलेला दिसून येतो मात्र जर फेसबुक व्हाट्सप ट्विटर आदी सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर कोणाला तरी आधार मिळू शकतो असाच अनुभव कजगाव येथे आला आहे कजगाव येथील अविनाश नवगिरे यांच्या चार महिन्याच्या मुलाला जळगाव येथील एका खाजगी डॉक्टरकडे वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आले डॉक्टरांनी सांगितलेली फी अंगाला काटे येणारी होती खिशात दमडी शिल्लक नाही आता करायचे काय असा प्रश्न नवगिरे यांना पडला व त्यांनी हताश होऊन इतरांकडून मदत मागितली मात्र मदतीचा आकडा मोठा असल्याने मदत पाहीजेत्या प्रमाणत मिळाली नाही म्हणून सदरील मदतीचा मेसेज गावातील कजगाव परिसरात ह्या ग्रुपमध्ये टाकण्यात आला व मदतीचे आवाहन करण्यात आले.
निराधार कुटुंबाच्या मदतीच्या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद दिला व मदतीचा ओघ इतका सुरू झाला की बारा तासतच तब्बल तीस हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा झाली जमा झालेली रक्कम नवगिरे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आली मदत म्हणून मिळालेली रक्कम आता नवगिरे कुटुंबातील बालकाच्या उपचारासाठी खर्च करण्यात येणार आहे यावेळी बालकाच्या आजी सताबाई नवगिरे बालकाचे वडील अविनाश नवगिरे विरेंद्रसिंग राजपूत चेतन पवार नितीन सोनार दिनेश भोई अनिल महाजन नाना पाटील पप्पू बोरसे हर्षल महाजन ऋषिकेश अमृतकर तेजस येवले राहुल पवार सागर महाजन यांनी सदरील मदत नवगिरे कुटुंबाच्या स्वाधीन केली आणि आई विना पोरक्या बालकाला मिळाला आधार.
जे बालक आता जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे त्याच बाळाच्या आईचे दुदैवाने एक महिन्या पूर्वीच दुःख निधन झाले होते त्यामुळे बालक आईविना पोरके झाले असून त्याला श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आई विना चार महिलांच्या बालकाची उपचारासाठी होत असलेली फरफट अनेकांच्या डोळ्यात अश्रू आननारीच होती त्यामुळे मदत देणाऱ्या हातांना अजूनच बळ मिळाले.
कजगाव परिसर ग्रुपचे सर्वत्र कौतुक
कजगाव परिसर ह्या ग्रुप मध्ये सामाजिक, पत्रकारीता, राजकीय ,शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व विविध क्षेत्रातील मंडळींचा समावेश आहे भडगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व्हाट्सप ग्रुप पैकी एक आहे सदरील ग्रुप हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेस असल्याने आता ही एक निराधार कुटुंबाच्या वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदतीसाठी पुढे आल्याने कजगाव परीसर ह्या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.