साईमत जळगाव प्रतिनिधी
समाज बांधनांनी शिक्षण, रोजगार, या गोष्टी कडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन आदिवासी पारधी क्रांती संघनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी केले. ते येथील जिल्हाधिकारी कार्यायातील अल्पबचत भवनात आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित समाजाच्या वधु-वर परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके, महासचिव दिपक खांदे, उपाध्यक्ष भगवान सोळंके, राज्यउपाध्यक्ष सुनिल दाभाडे, महिला प्रदेश अध्यक्षा संगीता पवार, महासचिव संगीता चव्हाण, प्रदेश मुख्य संघटक बन्सीलाल पवार, सचिव अमोल सुर्यवंशी, उत्तम दाभाडे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते वधु-वर परिचय मेळावा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. पुढे बोलतांना मुकेश साळुंके म्हणाले की, आगामी काळात सामुहिक विवाह किंवा मेळावा घेण्यात येईल. महासचिव दिपक खांदे यांनी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे. ऐकामेकातील भेदभाव विसरून समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे. प्रसंगी सचिव अमोल सुर्यवंशी, महासचिव महिला माथाडी संगिता चव्हाण यांनी आपली मनोगत व्यक्त केले. वधु-वर परिचय मेळाव्यात सुमारे २५० युवक- युवतींनी आपला परिचय दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र सिसोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे सुरेश सोनवणे, प्रदेश संघटक सचिन साळुंके, खान्देश विभाग अध्यक्ष विनोद साळुंके, रमेश आढारे, आरोग्यदूत समाधान पवार आदींसह सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी हजारोंचा संख्येने समाज बाधांव उपस्थित होते.
