साप पकडण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी दिली ‘टाँग’ची भेट
साईमत/रावेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील पाल येथील लक्ष्मण चैतन्य बापू आश्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव वन्यजीव संरक्षण संस्थेतील सदस्यांनी सर्प जनजागृतीच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. त्यात सर्प, सर्पदंश, प्रथमोपचारविषयी त्यांनी माहिती दिली. आश्रमात सर्प निघण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आश्रमाला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सापाला न हात लावता टाँगने कसा पकडायचा त्याविषयी माहिती दिली. आश्रमास साप पकडण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी टाँग भेट दिली.
यशस्वीतेसाठी जळगाव वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य राजेश सोनवणे, गणेश सपकाळे, किरण पाटील, हेमंत चव्हाण, बबलु सोनवणे, सागर मराठे, सागर चौधरी, राकेश लोखंडे, ऋषिकेश पाटील, योगेश गुंजाळ, वैभव पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी चैतन्य बापू आश्रमातील शिव चैतन्य महाराज यांनी वन्यजीव संस्थेच्या सर्व संस्थेसह सदस्यांचे आभार मानले.