अमळनेरला स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत

0
21

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शनिवारी, 23 मार्च रोजी अमळनेर तालुक्यात कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या. अमळनेर वकील संघाने त्यांना शुभेच्छा दिल्या. स्मिता वाघ यांचे ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात स्वागत करण्यात आले. लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या.

अमळनेर तालुक्यातील शिरूड, जवखेडा, पिंपळे येथील गुरुदेवदत्त मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. हे दत्त मंदिर निर्गुण निराकार आहे. या मंदिराची स्थापना शके 1441 मध्ये झाली आहे. मध्वमूनी महाराज यांच्या गादीचे त्यांनी दर्शन घेतले. जवखेडा, पिंप्री, पारोळा ढेकु, वाडी शिरपूर याठिकाणी महाराजांची मंदिरे आहेत. या परिसरामध्ये हे संस्थान जागृत संस्था म्हणून ओळखले जाते. यावेळी त्रेतापुरी महाराज यांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. मंदिर संस्थानच्या सभा मंडपामध्ये ग्रामस्थ, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शाम अहिरे म्हणाले, स्मिता वाघ यांच्या रूपाने आपल्या हक्काचा माणूस आपल्याला खासदार म्हणून मिळणार आहे. पर्यायाने मतदार संघाच्या विकासाला आता सुरुवात होणार आहे. आपल्या गावाचा खासदार होणार यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगितले.
जवखेडा येथे गावाच्या स्वागत कमानीजवळ ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जवखेडा येथे असलेल्या दत्त संस्थानच्या मंदिराला स्मिता वाघ यांनी भेट दिली. याठिकाणी मंदिराच्या सभा मंडपात जास्त कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते.

यावेळी संदीप पाटील म्हणाले, आज अभिमान वाटावा, गर्व वाटावा असा क्षण आलेला आहे. स्मिता वाघ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या स्मिताताई खासदार झाल्यानंतर निश्‍चितपणे मतदार संघाचा विकास होणार आहे. स्मिता वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पिंपळे बु., पिंपळे खु., अटाले येथे स्वागत करण्यात आले

अमळनेरला वकील संघात स्वागत

अमळनेर वकील संघाच्यावतीने स्मिता वाघ यांचे स्वागत करण्यात आले. वकील संघाच्या दालनात स्मिता वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निवडणुकीत यशासाठी स्मिता वाघ यांनी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अमळनेर वकील संघाचे सचिव ॲड. जितेंद्र साळी, अध्यक्ष चेतना पाटील, उमाकांत पाटील, आर.आर.भटनागर, आर.ए. निकुंभ, पी.व्ही.कुलकर्णी, के. व्ही.कुलकर्णी, अशोक बोरसे, जी. आर. अग्रवाल, गोपाळ सोनवणे, उमेश पाटील, शैलेश ब्रम्हे, विजय डिवरे, राजेश बिराडे, प्रशांत बडगुजर, प्रशांत संदनशिव, आर.व्ही.निकुंभ, प्रतिभा पांडे, माधुरी ढिवरे, टी.सी.पाटील आदी उपस्थित होते.

एबी ग्रुपकडूनही स्वागत

अमळनेर शहरातील फरशी रोडजवळ येथील एबी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलांची उधळण करत स्मिता वाघ यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी स्मितातार्इंना शुभेच्छा देणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी एबी ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here