भडगावला अवधूत मठीत लावले सहा हजार दिवे

0
12

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन केले होते. गुरुभक्त भिका गंगाराम पाटील यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थांच्या प. पू. लतामाई अवधूत दातार, आसावरी दातार भडगावचे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख, डॉ.ईश्‍वरसिंग परदेशी, विजयकुमार देशपांडे, डॉ.दीपक मराठे, डॉ.दुर्गेश रुले, मोरेश्‍वर पाटील, अवधूत पाटील, विलास चौधरी, उद्धव झांबरे, रंजना महाजन आदींसह भक्तमंडळी उपस्थित होते. पंधरा वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद महाराज दातार यांनी सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.

गेल्या १५ वर्षापासून अवधूत मठीत दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. उत्सवासाठी जळगावसह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदाही दीपोत्सव दिवसाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात नामस्मरणाने करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद दातार यांनी पंधरा वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेळगाव पंतबाळेकुंद्री येथून दिंडी ज्योत यात्रा भडगाव येथे आणली होती. तेव्हापासून येथे दीपोत्सवाच्या आयोजन करण्यात येते. यंदाही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संभाजीनगर, मुंबई, पुणे तसेच जळगाव जिल्ह्यातील भक्त सहभागी झाले होते. दरवर्षी दीपप्रज्ज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येते. परंतु यंदाचा मान गुरु भक्त भिका पाटील यांनी दीपोत्सवाचे दीपप्रज्ज्वलन केले. दरवर्षी भक्तांच्या हस्ते दीप उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच भक्त मंडळींनी मंदिराच्या गभाऱ्यासह सभामंडप, मंदिराच्या आवारात ६ हजार १०० दिवे लावण्यात आले. त्यामुळे दिव्यांचा झगमगाट दिसणारे नयनरम्य दृष्य अनेकांना मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here