छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन

0
48

चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे निवेदन

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध म्हणून मूक आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात अमळनेरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, त्याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आंदोलन करीत आहे. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि वैदिप्यमान शोघांचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा, अशी आग्रही मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, बाजार समितीचे संचालक भोजमल पाटील, चेतन पाटील, बाळू पाटील, एस.सी. तेले, सनी पाटील, पंकज साळी, अभिषेक ढमाळ, भूषण भदाने, सनी गायकवाड, महेश पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, रमेश पाटील, निलेश देशमुख, महिला तालुकाध्यक्ष प्रा.मंदाकिनी भामरे, नूतन पाटील, शरद सोनवणे, सुनील शिंपी, भारती शिंदे, शुभम बोरसे, सनी गायकवाड, नितीन भदाणे, निंबाजी पाटील, राहुल पवार, तारकेश्वर गांगुर्डे, प्रशांत बडगुजर, आशाताई चावरिया, अलका पवार, भूपेश सोनवणे, रणजोड पाटील निम, कल्पेश पाटील, शुभम पाटील, गोविंदा बाविस्कर, जितेंद्र पाटील, पंकज साळी, विनय पाटील, मनीष देसले, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here